लुपिन फाउंडेशनच्यावतीने नेरूर ग्रामपंचायत “ग्राम कोव्हिड विलगिकरण” कक्षेसाठी थर्मल गन,ऑक्सिमिटर, पीपीई किटचे वाटप

लुपिन फाउंडेशनच्यावतीने नेरूर ग्रामपंचायत “ग्राम कोव्हिड विलगिकरण” कक्षेसाठी थर्मल गन,ऑक्सिमिटर, पीपीई किटचे वाटप

कुडाळ /-

लुपिन फाउंडेशन, कुडाळच्या वतीने कोरोना कालावधीत काम करणाऱ्या ग्रामपंचायतीना विविध आरोग्यविषयक साहित्य पुरविण्यात येत आहे. त्यासाठी आज नेरूर देऊळवाडा ग्रामपंचायतीच्या “ग्राम कोव्हिड विलगिकरण” कक्षेसाठी थर्मल गन, पल्स ऑक्सिमिटर आणि पीपीई किट याचे ग्रामपंचायत कार्यालय नेरूर येथे नुकतेच वाटप करण्यात आले. यावेळी लुपिन फाउंडेशनचे कोरगांवकर ,ग्रामविकास अधिकारी वासुदेव कसालकर उपस्थित होते व नेरूर ग्रामपंचायतच्या वतीने ग्रामविकास अधिकारी वासुदेव कसालकर लुपिन फाउंडेशनचे कोरोना काळात चालेले चांगल्या उपक्रमाबाबत कौतुक केले व त्याच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

अभिप्राय द्या..