दहावी मुलांसाठी १ जुलै रोजी मालवण तंत्रनिकेतन येथे जिल्हास्तरिय युवा सिंधु प्रश्नमंजूषा..

दहावी मुलांसाठी १ जुलै रोजी मालवण तंत्रनिकेतन येथे जिल्हास्तरिय युवा सिंधु प्रश्नमंजूषा..

मालवण /-

मालवण शासकीय तंत्रनिकेतन, मालवणच्या वतीने १० वीच्या विद्यार्थ्यांकरिता जिल्हास्तरीय युवासिंधु प्रश्नमंजुषा स्पर्धा -२०२१ ही स्पर्धा दि. १ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता ऑनलाईन पद्धतीने आयोजित करण्यात आली आहे. हि स्पर्धा चालु घडामोडी, बुद्धिमत्ता चाचणी, बेसिक इंग्रजी व गणित या विषयावर आधारित असून विजेत्या प्रथम क्रमांक रुपये १००१ रोख, व द्वितीय विजेता स्पर्धकाला ५०१ रुपये रोख बक्षिस देण्यात येणार आहे. व प्रत्येक सहभागी स्पर्धकास ऑनलाईन ई-प्रमाणपत्र देण्यात येईल. स्पर्धा निशुल्क असून शालांत परीक्षा २०२१ (SSC Exam) चे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थी या स्पर्धेस पात्र असतील, प्रश्नमंजुषा स्पर्धा ऑनलाईन मोबाईल द्वारे १ जुलै रोजी सायंकाळी ६ वाजता घेण्यात येणार असून https://forms.gle/L1V3Zaj1UyYuffi37 या लिंक वर ६ वाजता क्लिक करून परीक्षा द्यायची आहे. अधिक माहिती साठी प्रा. डॉ. योगेश महाडिक, 9423682846, प्रा. डी. एन. गोलतकर 9764513133 यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन प्राचार्य डॉ. सुरेश पाटील यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..