आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून माणगांव विभागास मिळणार रुग्णवाहिका..

आमदार वैभव नाईक यांच्या माध्यमातून माणगांव विभागास मिळणार रुग्णवाहिका..

कुडाळ / सातत्याने शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या माणगाव पंचक्रोशी मध्ये सुसज्ज रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची ग्रामस्थांची मागणी होती. याबाबत शिवसेना पदाधिकारी व ग्रामस्थांनी सदर बाब आमदार वैभव नाईक यांच्या निदर्शनास आणून दिल्यावर आमदार वैभव नाईक यांनी लवकरच माणगाव विभागास रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्याची ग्वाही दिली होती. त्याप्रमाणे त्यांनी दिलेला शब्द पाळला असून रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली आहे.या रुग्णवाहिकेचे लोकार्पण गुरुवार १ जुलै रोजी दुपारी १२ वा. सिंधुदुर्ग कोल्हापूर संपर्कप्रमुख श्री. अरुणभाई दुधवडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत व सिंधुदुर्ग जिल्हा बँक अध्यक्ष श्री. सतीश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली माणगाव बाजारपेठ चौक येथे होणार आहे. या उदघाटन प्रसंगी आमदार वैभव नाईक, शिवसेना नेते संदेश पारकर, शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, उप जिल्हाप्रमुख अमसेन सावंत, जिल्हा परिषद गट नेते नागेंद्र परब, तालुका प्रमुख राजन नाईक, अतुल बंगे, जिल्हा परिषद सदस्य राजू कविटकर, माजी जिल्हा परिषद सदस्य रमाकांत ताम्हाणेकर, तालुका संघटक बबन बोभाटे, महिला जिल्हाप्रमुख जान्हवीताई सावंत, पंचायत समिती सदस्या श्रेया परब उपस्थित राहणार आहेत. तरी या उदघाटन प्रसंगी नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना उपतालुका प्रमुख कृष्णा धुरी, युवासेना तालुका प्रमुख योगेश धुरी, घावनळे विभाग प्रमुख रामभाऊ धुरी, माणगाव विभाग प्रमुख अजित करमरकर, विभाग संघटक कौशल जोशी यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..