युवा परिवर्तन संस्थेकडून बॅरिस्टर नाथ पै कोविड केअर सेंटरला वैद्यकीय उपकरणांची मदत..

युवा परिवर्तन संस्थेकडून बॅरिस्टर नाथ पै कोविड केअर सेंटरला वैद्यकीय उपकरणांची मदत..

कुडाळ /-

युवा परिवर्तन ही संस्था संपूर्ण भारत देशांमध्ये काम करत असून सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये तीन हजार पेक्षा जास्त लोकांना NSDC चे प्रशिक्षण देऊन अनेक लोकांना रोजगार निर्माण करून दिला आहे शिक्षण संस्था ही युवा परिवर्तन ची पार्टनर असून नर्सिंग असिस्टंट ऑपरेशन थेटर मॅनेजमेंट यासारखी प्रशिक्षण सातत्याने आयोजन करीत आहे महाराष्ट्र मध्ये पोलादपूर. मातृमंदिर देवरुख. या ठिकाणी सुद्धा कोविड सेंटरला उपकरणांच्या वाटप करण्यात आले आहे त्याचप्रमाणे गरजूंना धान्य वाटपाचे सुद्धा काम सुरू आहे
युवा परिवर्तन या संस्थेच्या वतीने बॅरिस्टर नाथ पै शिक्षण संस्था यांनी सुरू केलेल्या को विड केअर सेंटर ला 5 लाख रुपयाचे वैद्यकीय उपकरणे वाटप करण्यात आली
यामध्ये ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेट अर 2.. ऑक्सीजन सिलेंडर..2 ऑक्सी मीटर 15..PPE.KIT 200 .. मास्क..500. असे जवळजवळ पाच लाखाचे साहित्य देण्यात आले त्यावेळी युवा परिवर्तन चे एरिया मॅनेजर दत्तात्रय परुळेकर. समन्वयक.. दीपक कुडाळकर, विवेक नाईक, दत्तप्रसाद पाटकर, त्याचप्रमाणे नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्य कल्पना भंडारीव सहकारी स्टाफ उपस्थित होत्या

अभिप्राय द्या..