राज्यस्तरीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेत आर्या कदमचे यश!

राज्यस्तरीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेत आर्या कदमचे यश!

मसुरे /-

महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आयोजित विभागीय खुलागट ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेत कणकवली येथील
आर्या किशोर कदम हिने तृतीय क्रमांक पटकावला आहे. लोक कल्याणकारी, बहुजनांचे प्रेरणास्थान, रयतेचे राजे छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त बहुआयामी लोकराजा राजर्षी शाहू महाराज या विषयावर महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने विभागीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली होती. यामध्ये ठाणे मुंबई नवी मुंबई रायगड पालघर सिंधुदुर्ग रत्नागीरी जिल्ह्यातील ५९ स्पर्धक सहभागी झाले होते.
कलमठ येथील आर्या किशोर कदम ही एस एम हायस्कुल कणकवली येथे शिक्षण घेत आहे. तिच्या यशा बद्दल शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक तसेच कलमठ सरपंच देविका गुरव, ग्रामपंचायत सदस्य संदिप मेस्त्री,फुले आंबेडकर दर्पण प्रबोधनीचे अध्यक्ष राजेश कदम व कास्ट्राईब शिक्षक संघटना जिल्हा सचिव विकास वाडीकर यांनी अभिनंदन केले. यापूर्वी तीने कथाकथन, वक्तृत्व स्पर्धेत भाग घेऊन प्राविण्य प्राप्त केलेआहे. मी सावित्रीबाई फुले बोलतेय तसेच मी राजमाता जिजाऊ बोलतेय, मी किल्ला बोलतोय असे विषय स्पर्धेत हाताळले आहेत. विभागीय वक्तृत्व स्पर्धेत यश प्राप्त केल्याने तिचे सर्व स्तरातून कौतूक होत आहे

अभिप्राय द्या..