सोमवार पासून मालवण आगारातून पुणे,बार्शी व रत्नागिरी बस सुरू होणार..

सोमवार पासून मालवण आगारातून पुणे,बार्शी व रत्नागिरी बस सुरू होणार..

मालवण/-

कोरोनामुळे लागू केलेल्या कडक निर्बंधांच्या लॉकडाऊनमध्ये राज्य शासनाने शिथिलता आणल्या नंतर परिवहन विभागाकडून काही एसटी बस फेऱ्या पुन्हा सुरू करण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर मालवण आगारातून लांब पल्याच्या तीन बस फेऱ्या दिनांक २८ जून पासून सुरू करण्यात येत आहेत. यामध्ये मालवण – बार्शी वेळ पहाटे ४:५०, मालवण – रत्नागिरी वेळ सकाळी ११:१५, मालवण – पुणे वेळ सायंकाळी ४:१५ या बस फेऱ्याचा सामावेश आहे अशी माहिती मालवण एसटी आगाराकडून देण्यात आली आहे.

अभिप्राय द्या..