अहमदनगर हादरले आयसीयुत उपचार घेणाऱ्या तरुणीने रुग्णालयातच केली आत्महत्या..

अहमदनगर हादरले आयसीयुत उपचार घेणाऱ्या तरुणीने रुग्णालयातच केली आत्महत्या..

अहमदनगर /-

देवळाली प्रवरा येथील १७ वर्ष वयाच्या तरुणीने पाच दिवसापुर्वी विषारी औषध सेवन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला.सदर तरुणीवर राहुरी फँक्टरी येथिल नर्सिंग होम मध्ये उपचार चालू असताना गुरुवारी सायंकाळी 7-30 वाजता रुग्णालयात गळफास घेऊन आत्महत्या केल्याने खळबळ उडाली असुन नर्सिंग होमच्या कर्मचाऱ्यांच्या भोंगळा कारभार पुन्हा समोर आल्याने तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.याबाबत समजलेली माहिती अशी की, देवळाली प्रवरा येथील पायल सुभाष मुसमाडे (वय 17) हिने पाच दिवसा पुर्वी राहत्या घरी विषारी औषध घेवून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

पायल हिने औषध घेतल्याचे लक्षात येताच घरच्यांनी राहुरी फँक्टरी येथिल विवेकानंद नर्सिंग होम मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले.तिच्यावर अतिदक्षता मध्ये उपचार सुरु असताना गुरुवारी सायंकाळी 7-30 वाजता अतिदक्षता मधील कंपार्टमेंट मध्ये साडीच्या साह्याने गळफास घेवून आत्महत्या केली आहे.घटनास्थळी पोलीसांना पाचारण करण्यात आले होते.विवेकानंद नर्सिंग होम मध्ये उपचारासाठी दाखल झालेल्या 17 वर्षाच्या तरुणीने गळफास घेवून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.नर्सिंग होमचा भोंगळा कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.नर्सिंग होम मधील कर्मचारी, परीचारीका ईर्मजन्सी वार्ड मध्ये बसुन मोबाईलवर संभाषण, चँटींग, गेम आदी प्रकार सुरु असतात दाखल असलेल्या रुग्णांकडे पाहण्यास त्यांना वेळ मिळत नाही.या कर्मचाऱ्यांच्या अनेक वेळा तक्रारी करुन प्रशासन दखल घेत नाही.पायल हिच्या आत्महत्येस जबाबदार कोण? असा प्रश्न नागरिकांमधुन केला जात आहे. राहुरी पोलीसांनी आकस्मत मृत्यूची नोंद केली असुन पुढील तपास राहुरी पोलीस करीत आहे.

अभिप्राय द्या..