You are currently viewing ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द करण्याचे पाप भाजपचेच ओबीसी जिल्हा प्रमुख रुपेश पावसकर..

ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द करण्याचे पाप भाजपचेच ओबीसी जिल्हा प्रमुख रुपेश पावसकर..

कुडाळ /-

ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द करण्याचे पाप हे भाजप सरकारचेच आहे आणि या पापाचे धनी देवेंद्र विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आहेत असा सणसणीत आरोप शिवसेना ओबीसी जिल्हा प्रमुख रुपेश पावसकर यांनी आज कुडाळ येथे पत्रकारांशी बोलताना केला आहे.

या वेळी पावसकर बोलताना पुढे की, म्हणाले ओबीसी आरक्षण रद्द झाले म्हणून भाजपवाले आंदोलन करीत आहेत खर तर आपले पाप लपवण्यासाठी आंदोलन करुन ओबीसी समाजाला फसवत आहेत.असा आरोप करीत श्री पावसकर म्हणाले की,तात्कालिक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 2019 ला ओबीसी आरक्षण कपातीचा अध्यादेश काढून त्याच वेळी ओबीसी समाजाचा घात केला होता. हे नव्याने भाजपमध्ये प्रवेश केलेल्या चित्रा वाघ यांना माहीती असुनही डोळ्यावर पट्टी बांधून असल्यासारखे आंदोलनाची भाषा करत आहेत असा आरोप करत रुपेश पावसकर म्हणाले महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना.उध्दव ठाकरे हे कुठल्याच समाजावर अन्याय करायला देत नाही त्यामुळे आम्हाला खात्री आहे ख-याअर्थाने ओबीसी समाजाला न्याय देतील असे ठाम पणे पावसकर यांनी सांगितले ओबीसी समाज गप्प बसणारा नसुन ज्या ज्या वेळी ओबीसी समाज आरक्षणासंदर्भात आंदोलन उभारेल त्या,त्या,, वेळी शिवसेना पाठीशी राहील असेही श्री पावसकर यांनी सांगितले आहे.

अभिप्राय द्या..