आडाळी येथील सुश्रुत लळीत रशियातील स्मोलेन्स्क विद्यापीठातून एमबीबीएस उत्तीर्ण

आडाळी येथील सुश्रुत लळीत रशियातील स्मोलेन्स्क विद्यापीठातून एमबीबीएस उत्तीर्ण

सिंधुदुर्गनगरी /-

दोडामार्ग तालुक्यातील आडाळी गावातील सुश्रुत बाळकृष्ण लळीत याने रशियातील स्मोलेन्स्क मेडिकल अकादमी या रशियन सरकारच्या विद्यापीठातून एम. बी. बी. एस. ही वैद्यकीय क्षेत्रातील उच्च पदवी नुकतीच संपादन केली. सुश्रुत याने आपले बारावी पर्यतचे शिक्षण शिरूर येथील विद्याधाम प्रशालेतून घेतले होते . त्यानंतर वैद्यकीय शिक्षणासाठी त्याने रशिया गाठले. स्मोलेन्स्क हे शहर मॉस्कोपासुन सुमारे ४००. कि.मी. दूर असुन तेथील हवामान कायमचे अतिथंड असते. प्रतिकुल हवामान असुनही अनेक भारतीय विद्यार्थी तेथे वैद्यकीय शिक्षण घेत असतात. स्मोलेन्स्क स्टेट मेडिकल अॕकडेमीने गेल्यावर्षी शताब्दी वर्ष साजरे केले. डाॕ. सुश्रुत याला मिखाईल युरोविच, एलिना पेत्रोवना, युलिआ कोर्नेवा, युरी लोमोचेन्कोव, बस्कोव तमारा यांचे मार्गदर्शन मिळाले. विद्यापीठाचा पदवीदान समारंभ नुकताच झाला. सुश्रुत लवकरच मायदेशी परत येऊन वैद्यकीय सेवा करणार आहे. डॉ. सुश्रुत हा शिरुर (घोडनदी) येथील सी. टी. बोरा महाविद्यालयाचे मराठी विभागप्रमुख व मालवणी बोलीचे अभ्यासक प्रा. डॉ. बाळकृष्ण लळीत यांचा सुपुत्र आहे.

अभिप्राय द्या..