जागतिक योग दिनाच्या निमित्ताने योग गुरु डाॅ. वसुधा मोरे यांचा भाजपा सिंधुदुर्गच्या वतीने सत्कार..

जागतिक योग दिनाच्या निमित्ताने योग गुरु डाॅ. वसुधा मोरे यांचा भाजपा सिंधुदुर्गच्या वतीने सत्कार..

वेंगुर्ला /-

वेंगुर्ला ओम योगसाधनालय संचलीत डाॅ. वसुधाज् योगा अॅड फिटनेस अकॅडमीच्या माध्यमातून देश – विदेशात योगाचे प्रशिक्षण देणाऱ्या योगगुरु डाॅ.वसुधा मोरे यांचा माजी जिल्हाध्यक्ष व जिल्हा बॅंकेचे संचालक अतुल काळसेकर व प्रदेश का.का.सदस्य शरदजी चव्हाण यांच्या हस्ते सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला.डाॅ. वसुधा मोरे यांनी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये यश संपादन करून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे नाव रोशन केले. तसेच विविध मानाचे पुरस्कार मिळवलेले आहेत. तसेच योगाच्या संबंधित राष्ट्रीय योग शिक्षा कार्यकारिणीवर सन्माननीय सदस्य म्हणून कार्ययत आहेत. तसेच वैद्यकशास्त्राच्या माध्यमातून रुग्णसेवाही केलेली आहे.तसेच योगशास्त्र व क्रीडायोगाच्या माध्यमातून योगपटु व योगप्रशिक्षक निर्माण करण्याचे उल्लेखनीय कार्य केलेले आहे. या कार्याची दखल घेऊन भाजपा – सिंधुदुर्ग च्या वतीने योगगुरु डाॅ. वसुधा मोरे यांचा सत्कार करण्यात आला.यावेळी जिल्हा संघटन सरचिटणीस प्रभाकर सावंत, जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना देसाई, नगराध्यक्ष दिलीप उर्फ राजन गिरप, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर,ता.सरचिटणीस प्रशांत खानोलकर,नगरसेवक प्रशांत आपटे,धर्मराज कांबळी, नगरसेविका पुनम जाधव, महिला सरचिटणीस वृंदा गवंडळकर,ता.उपाध्यक्ष मनवेल फर्नांडिस, युवा मोर्चा चे प्रणव वायंगणकर,ओंकार चव्हाण आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..