मळगाव रेल्वेस्टेशन येथील सामुहीक बलात्कार प्रकरणातील आरोपी राऊळ बंधुंचे जामीन अर्ज फेटाळले..

मळगाव रेल्वेस्टेशन येथील सामुहीक बलात्कार प्रकरणातील आरोपी राऊळ बंधुंचे जामीन अर्ज फेटाळले..

सिंधुदुर्ग /-

सावंतवाडी तालुक्यातील एकूण तीन आरोपीं विरुद्ध भा. द. वी. कलम ३२८ ३६३, २६६[31] ३६८, ३७६ व ३७६ [२] [एच) व (आय), ३७६ [5] १२० ब. ५०६ सह बालकांचे लैंगिक शोषणापासून संरक्षण अधिनियम २०१२ चे कलम ४, ५ [ग] आणि ६ अंतर्गत गुन्हा दाखल केलेला आहे.उपरोक्त गुन्हा हा सामुहिक बलात्काराचा असून यांतील आरोपी क्र. १ घाडी याने दिनांक २१.०९.२०१८ रोजी एका अल्पवयीन मुलीला धमकी देऊन जबरदस्तीने सावंतवाडी येथून सावंतवाडी रोड रेल्वेस्थानकाच्या समोरील अनय लॉज येथे नेऊन तिला गुंगीकारक पाणी प्यायला देवून तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केला व तिला यांतील आरोपी क्र. २ व ३ ( राऊळ बंधु) यांच्या ताब्यात दिले. त्यानंतर आरोपी क्र. २ व ३ यांनी पीडित मुलीला रेल्वेस्थानकावरील प्लॅटफॉर्म नं. ३ वर नेऊन गुंगीकारक पाणी प्यायला देऊन तिच्यावर जबरदस्तीने बलात्कार केल्याबद्दल सबळ पुरावा उपलब्ध झाल्याने या गुन्हयातील आरोपी क्र. १ ते ३ यांच्याविरुद्ध मा. विशेष न्यायाधीश सत्र न्यायालय ओरोस यांचे न्यायाळ्यात गुन्हयाचे दोषारोपपत्र सादर केलेले आहे.

आरोपी नं. २ व ३ यांनी कोविड- १९ अंतर्गत निर्गमित केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार (नि. ११९ व नि. १२० ) तसेच नियगीत जामिन अर्ज (नि. १२२) देऊन आपली जामिनावर मुक्तता करण्यात यावी, अशी विनंती केलेली होती. सरकार पक्षा तर्फे विशेष सरकारी अभियोक्ता अॅड. अजित उर्फ एस. एन. भणगे यांनी आपल्या युक्तीवादात आरोपी नं. २ व ३ हे जुळे भाऊ असून त्यांची परिसरात दहशत आहे. त्यामुळे आरोपींची जमिनावर मुक्तता केल्यास साक्षीदारांवर दबाव आणण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. तसेच मळगाव रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्र. ३ वर ज्या शेडमध्ये बलात्काराची घटना घडली. त्यावेळी पिडीत मुलीच्या अंगावर असलेल्या बिनवाह्यांच्या टॉपचा एक बेल्ट तेथे पंचनाम्याच्यावेळी सापडून आला. सदरचा बेल्ट व उपरोक्त पिडीत मुलीने परिधान केलेला बिनवाह्यांचा टॉप संचालक न्याय वैद्यकीय प्रयोगशाळा, मुंबई यांच्याकडे पाठविण्यात आला असता, सदरचा बेल्ट व बिनबाह्यांचा टॉप हे एकाच धाग्याच्या कापडापासून झालेले असल्याचा अहवाल सहाय्यक रासायनिक विश्लेषक यांनी दिलेला आहे. त्यामुळे त्यांना जागिन मुक्त करू नये अशी विनंती केली.

सदर गुन्ह्यातील आरोपी क्र. २ व ३ यांनी यापूर्वी जामीनासाठी चार अर्ज दाखल केले होते. वे फेटाळण्यात आले. त्यानंतर वरील तीन अर्ज दाखल केले. सदरचे अर्ज मा. विशेष सत्र न्यायाधिश श्री. आर. बी. रोटे साहेब यांनी उभय बाजूंचा युक्तीवाद ऐकून फेटाळले. याकामी विशेष सरकारी अभियोक्ता अॅड. अजित उर्फ एस. एन. भणगे यांना अॅड. स्वप्ना सामंत, अँड. श्री. मिहीर भणगे अॅड. श्री. सुनील मालवणकर यांनी मदत केली. तपासी अंमलदार स्वाती यादव बाबर यांचे सहकार्य लाभले.

अभिप्राय द्या..