सर्वच राजकीयपक्ष कोरोनाचे नियमावली पाळत नसल्याने सिंधुदुर्गात होतो कोरोनाचा मोठा फैलाव.;राजकिय पक्षांमुळे जिल्हा गेला रेडझोनमद्धे..

सर्वच राजकीयपक्ष कोरोनाचे नियमावली पाळत नसल्याने सिंधुदुर्गात होतो कोरोनाचा मोठा फैलाव.;राजकिय पक्षांमुळे जिल्हा गेला रेडझोनमद्धे..

सिंधुदुर्ग /-

समील जळवी /-

सिंधुदुर्गातील सर्वच राजकीय पक्ष कोरोनाचे नियमावली पाळत नसल्याने सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा मोठा फैलाव होत आहे.राजकिय पक्षांमुळे जिल्हा गेला रेडझोनमद्धे अशी चर्चा जिल्ह्यातील सर्वच तालुकास्तरावर ,गावा-गावात होत आहे.आणि सर्वसामान्य जनतेला नियमावली दाखवली जात आहे.अश्या वेगवेगळ्या जिल्ह्यातील नागरिकांच्या व्यक्त होत आहे संतप्त प्रतिक्रिया यामुळे “कोरोना “हा सिंधुदुर्ग जिल्ह्यातून लवकर हद्दपार होणे आता कठीण झाले आहे.

ओबीसी आरक्षण रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर भाजपने संपुर्ण महाराष्ट्रात २६ जून रोजी जन आक्रोश आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.याच पार्श्वभूमीवर भाजपच्या महिला प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा दौरा केला खरा परंतु सध्या सिंधुदुर्ग जिल्हा हा रेड झोन मध्ये आला आहे.हे सर्व भाजपच्या नेत्यांना तसेच पदाधिकारी यांना माहिती असुनही कुडाळ येथील शासकीय विश्रामगृहात मोठी गर्दी झाली होती.तर २३ जून रोजी भाजपचे आशिष शेलारही सिंधुदुर्गात येणार असल्याने पदाधिकारी व कार्यकर्त्यांची गर्दी होणार या गर्दी मुळे सिंधूदुर्ग जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्याही आणखी मोठ्या प्रमाणात वाढू लागली तर याला जबाबदार कोण? असा सवाल सर्वसामान्य जनतेतून विचारला जात आहे.तर सर्वसामान्य लोकांच्या कार्यक्रमासाठी शासनाची नियमावली जाहीर तर दुसरीकडे राजकीय पुढाऱ्यांच्या कार्यक्रमाला नियम न पाळता मीटिंग,बैठका हे मोठ्या सुरू आहेत.यामुळेच कोरोनाचा फैलाव सिंधुदुर्ग जिल्ह्यात होत आहे.

चार दिवसापूर्वी शिवसेनेच्या ५५ व्या,वर्धापन दिनानिमित्त कुडाळ पेट्रोल पंपावर नियमाचे पालन न करता सोशल डीष्टनसिंग चे पालन नाकारता शिवसेनेचे नेते व कार्यकर्ते तसेच भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये श्रेय वादासाठी तुफान गर्दी पाहायला मिळाली.मात्र सर्वसामान्यांसाठी एक न्याय तर दुसरीकडे राजकीय पुढारीसाठी दुसरा नियम पाहायला मिळत आहे.तर सर्वसामान्य जनतेतून मधून या राजकीय पक्षांच्या मिटींग,बैठकीची चर्चा पाहायला मिळत आहे.अश्या प्रकारे सिंधुदुर्ग जिल्ह्यात राजकीय पुढाऱ्यांच्या बैठका,सार्वजनिक आंदोलने होत राहिली तर येणाऱ्या काळात कोरोना आणखीन फैलावण्याची दाट शक्यता आहे.

अभिप्राय द्या..