अवैद्य दारू व्यवसाय करणाऱ्या चेतन मुसळे यांना शिवसेनेवर बोलण्याचा अधिकार नाही.;विजय पालव

अवैद्य दारू व्यवसाय करणाऱ्या चेतन मुसळे यांना शिवसेनेवर बोलण्याचा अधिकार नाही.;विजय पालव

मालवण /-

गेली अनेक वर्षे चेतन मुसळे हे अवैद्यरित्या सुकळवाड येथे दारू विक्री व्यवसाय करीत आहेत हे सर्वज्ञात आहे. त्यांची हि अवैद्य दारू विक्री लक्षात आल्यामुळे व अश्या व्यक्तीला पक्षात ठेऊन नुकसान होऊ नये याकरिता काही वर्षांपूर्वी चेतन मुसळे यांची शिवसेना पक्षातुन हकालपट्टी करण्यात आली. हे भाजपच्या जिल्हा पातळीवरील पदाधिकाऱ्यांना माहित असूनही केवळ सुकळवाड येथे भाजप चा कोणीच पदाधिकारी नसल्याने चेतन मुसळे याला भाजप मध्ये प्रवेश देऊन पदाधिकारी केले याला भाजप चे दुर्दैवच म्हणावे लागेल. जिल्ह्यातील सर्व यंत्रणा त्यावेळी राणेंच्या हातात असताना एकट्या वैभव नाईकांनी आमने सामने च्या माध्यमातून राणेँच्याच मैदानात राणेंना धूळ चारली हे समस्त सिंधुदुर्ग जिल्हावासीयांना माहित आहे. आमदार वैभवजी नाईक हे आमने सामने ला स्वतः एकटेच सामोरे गेले हे हि सर्वांना माहित आहे त्यामुळे त्यावेळी आपण सोबत होतो अशा खोट्या बढाया चेतन मुसळे यांनी मारू नयेत. पोलिसांपासून वाचण्यासाठी चेतन मुसळे कोठे कोठे दडून राहतात हे आम्हांला चांगलेच माहित आहे. त्यामुळे आम्ही तोंड उघडले तर मुसळे यांना तोंड दाखवायला जागा राहणार नाही त्यामुळे मुसळे यांनी आपल्या मर्यादेतच राहावं. जास्त बडबड केली तर सर्व धंदे बाहेर काढू अशी घणाघाती टीका आज शिवसेना पोईप विभागप्रमुख विजय पालव यांनी चेतन मुसळे यांच्यावर केली आहे.

अभिप्राय द्या..