वेंगुर्ला /-
मातोश्री सेवाधाम ट्रस्ट मुंबईच्या वतीने रेडी प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत मधील २५ आशाताईना अन्यधान्य चे किट आणि मास्क जिल्हा परिषद सदस्य प्रितेश राऊळ यांच्या पुढाकाराने देण्यात आले.यावेळी मातोश्री सेवाधाम ट्रस्टचे अध्यक्ष अमित बने,रेडी सरपंच रामसिंग राणे,शिरोडा सरपंच मनोज उगवेकर, शिरोडा उपसरपंच राहुल गावडे,रेडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.नवार,डॉ.शुक्ला,मातोश्री सेवाधाम ट्रस्टचे मेम्बर रवि राणे,सुदर्शन राऊळ,आरोग्य विभागाचे कर्मचारी आदी उपस्थित होते.तसेच आशाताईना रेनकोट देण्याचे आश्वाशन मातोश्री सेवाधाम ट्रस्टच्या वतीने देण्यात आले.