देवबाग मधील तौक्ते वादळग्रस्तांना अन्नधान्य आणि फेस मास्क चे वाटप<br>मातोश्री सेवाधाम आरोग्य ट्रस्ट आणि मनसे यांचा संयुक्त..

देवबाग मधील तौक्ते वादळग्रस्तांना अन्नधान्य आणि फेस मास्क चे वाटप
मातोश्री सेवाधाम आरोग्य ट्रस्ट आणि मनसे यांचा संयुक्त..


चौके /-


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवबाग या सुप्रसिद्ध पर्यटनस्थळाचे तौक्ते वादळामुळे नुकसान झाले होते. गावकऱ्यांच्या हाकेला प्रतिसाद देत राज साहेब ठाकरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून मातोश्री सेवाधाम आरोग्य सेवा ट्रस्ट चे विश्वस्त आणि मनसेचे सरचिटणीस, डॉ. मनोज चव्हाण, यांच्या मार्गदर्शनाखाली देवबाग मधील नुकसानग्रस्त ग्रामस्थांना जीवनावश्यक लागणाऱ्या अन्नधान्याच्या संपूर्ण किटचे आणि फेस मास्कचे वाटप करण्यात आले. तसेच डॉ. दत्ता सामंत न्यू इंग्लिश स्कुल या शाळेच्या विनंती वरून त्यांना पत्रे व कौले देण्यात आली.
या प्रसंगी श्री. अमित बने, संदीप परब, विनायक हादगे, विक्रोळी विधानसभेचे विभाग अध्यक्ष श्री. विनोद शिंदे, पृथ्वीराज येरूणकर, मनसे उपाध्यक्षा, माजी नगरसेविका अनिषा माजगावकर, माजी नगरसेविका वैष्णवी सरफरे, नगरसेविका सुजाता पाठक, बदलापूर शहर अध्यक्षा संगीता चेंदवणकर, सिंधुदुर्ग जिल्ह्या अध्यक्ष श्री. धीरज परब व देवबागचे स्थानिक विध्यार्थी सेनेचे पास्कल रोड्रीग्स तसेच पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

अभिप्राय द्या..