पेंडूर येथे आशा स्वयंसेविका,यांना छत्र्यांचे वाटप..

पेंडूर येथे आशा स्वयंसेविका,यांना छत्र्यांचे वाटप..


चौके /-


भाजपा युवामोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद भाई सावंत यांच्या 38 वा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत साधेपणाने साजरा करण्यात आला. कोरोना काळात जिल्ह्यातील गावागावात आशा सेविका ह्या आपल्या जीवाची पर्वा न करता कोरोना योद्धा म्हणून काम करत आहेत त्यांच्या कार्याचा गौरव व्हावा आपल्या वाढदिवसानिमित्त एक आठवण त्यांना भेटवस्तू म्हणून देण्यात यावी यादृष्टीने त्यांना जिल्ह्यात ठिकठिकाणी छत्रीवाटप करण्यात आली यावेळी त्या देत असलेल्या सेवेबद्दल त्यांचे आभार देखील भाई सावंत यांनी मानले समाजाचे आरोग्य निरोगी ठेवण्याच्या दृष्टीने त्यांचे योगदान महत्वाचे आहे आपण करत असलेल्या कार्याला मनापासून आमचा सलाम व शुभेच्छा आहेत अशा शब्दात त्यांनी प्रतिपादन केले.
यावेळी युवामोर्चा जिल्हाध्यक्ष आनंद भाई सावंत, युवामोर्चा मालवण उपतालुकाध्यक्ष मंदार मठकर, पेंडुर सरपंच सुनीता मोरजकर, कट्टा उपसरपंच मकरंद सावंत, दिपा सावंत, संजय नाईक, अमित सावंत, रविंद्र गावडे, अश्विनी पेडणेकर ,अंकिता सावंत, गणेश वाईरकर,तेजस म्हाडगुत, वैभव कवठणकर, प्रविण मिठबांवकर, प्रदीप मिठबांवकर, प्रवीण आचरेकर, समीर रावले, महेश चव्हाण, गौरव हिर्लेकर, मंदार पडवळ, अजित भोगले, शुभम राठीवडेकर, प्रजेश सावंत व भाजपा युवामोर्चा पदाधिकारी तसेच आशा स्वयंसेविका व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..