मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या पुढाकाराने कसाल ग्रामपंचायतीला औषधे, पीपीई किट, फेस मास्क, फेस शिल्ड व सॅनिटायझेर वस्तू प्रदान

मनसे जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या पुढाकाराने कसाल ग्रामपंचायतीला औषधे, पीपीई किट, फेस मास्क, फेस शिल्ड व सॅनिटायझेर वस्तू प्रदान

कुडाळ /-

कसाल ग्रामपंचायतीने केलेल्या आवाहनानुसार जिल्हाध्यक्ष धीरज परब यांच्या पुढाकाराने आज मनसे नेते मातोश्री ट्रस्टचे अध्यक्ष मनोजजी चव्हाण आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांच्या वतीने मा. राजसाहेबांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून कोविड उपचारासाठी लागणारी औषधे, पीपीई किट, फेस मास्क, फेस शिल्ड व सॅनिटायझेर वस्तू प्रदान केल्या तसेच मनसे लॉटरी सेनेचे अध्यक्ष श्री. गणेश कदम यांच्या वतीने कोविड अलीगीकरण कक्षासाठी रोख १०,०००/- राघोजी कदम यांच्या हस्ते ग्रामविकास अधिकारी सौ शालिनी कोकरे, उपसरपंच श्री दत्ताराम सावंत, श्री संतोष राणे तसेच माझं गाव कसाल कोरोना मुक्त अभियान टास्क टीम श्री यशवंत परब , श्री अवधूत मालणकर ,श्री बाळा कांदळकर श्री प्रकाश नारकर आणि त्यांचे सहकारी यांच्या जवळ सुपूर्द करण्यात आले. या प्रसंगी ट्रस्ट चे संदीप परब माजी तालुका अध्यक्ष श्री. गणेश वाईरकर मनसे शाखा अध्यक्ष श्रीअनिल कसालकर, श्री मंगेश कसालकर परेल ,नीतेश लाड, सुशांत कसालकर, पृथ्वीराज येरूणकर, आदिल शहा, व गावातील मान्यवर उपस्थित होते. कोरोना महामारीच्या काळात तातडीने मनसे मार्फत मदत पोहचल्या मुळे सर्वत्र मनसेचे कौतुक होत आहे. यावेळी ग्रामपंचायतीने व ग्रामस्थांनी माननीय राज साहेब ठाकरे, श्री. मनोजजी चव्हाण, श्री. गणेश कदम, धिरज परब व राघोजी कदम अनिल कसालकर यांचे आभार मानले.

अभिप्राय द्या..