ज्यांना लक्षणे आहेत त्यांचीच टेस्ट केली जाणार प्रत्येक प्रभागात कॅम्प लावणार.;आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर यांची माहिती..

ज्यांना लक्षणे आहेत त्यांचीच टेस्ट केली जाणार प्रत्येक प्रभागात कॅम्प लावणार.;आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर यांची माहिती..

सावंतवाडी /-

सावंतवाडीतील ज्यांना कोरोना सदृश्य लक्षणे आहेत, त्यांचीच प्रभागात सुरू करण्यात येणाऱ्या केंद्रात टेस्ट घेण्यात येणार आहे. कोणाचीही टेस्ट घरोघरी केली जाणार नाही, त्यामुळे इच्छा असलेल्यांनी आपली टेस्ट करुन घ्यावी, असे आवाहन सावंतवाडी पालिकेचे आरोग्य सभापती तथा नगरसेवक सुधीर आडीवरेकर यांनी केले आहे. येथील पालिकेकडुन कोरोनाचे रुग्ण कमी करण्याच्या उद्देशाने रॅपिड टेस्ट करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी प्रभागवार कॅम्प घेवून ज्यांची इच्छा असेल अशा नागरीकांची टेस्ट केली जाणार आहे, असे त्यांनी सांगितले. ही टेस्ट करताना सरसकट करण्यात येणार नाही, असे सावंतवाडी नगरपालिकेचे आरोग्य सभापती सुधीर आडीवरेकर यांनी आज पत्रकारांशी बोलताना सांगितले.

अभिप्राय द्या..