प्रलंबित मागण्यांसाठी आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक आजपासून बेमुदत संपावर..

प्रलंबित मागण्यांसाठी आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक आजपासून बेमुदत संपावर..

आचरा /-
कोरोना महामारीत आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत काम करणाऱ्या महाराष्ट्रातील आशा वर्कर्स आणि गटप्रवर्तक १५जून पासून बेमुदत संपावर जात आहेत. यात आचरा येथील पाच आशा वर्कर्स ही सहभागी झाले असल्याची माहिती आचरा येथील आशांकडुन देण्यात आली असून तशाप्रकारचे पत्र आचरा प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारयांना मंगळवारी देण्यात आले.
महाराष्ट्र राज्यातील आशा व गटप्रवर्तक यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. यासाठी महाराष्ट्र आशा कर्मचारी समन्वय समिती कडून १५जून पासून बेमुदत संपाचा इशारा दिला होता. समिती कडून महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्र्यांनाही निवेदन देण्यात आले होते. सिंधुदुर्ग आशा वर्कर्स संघटनेच्या माध्यमातून जिल्ह्याधिकारी यांना ही निवेदन दिले असल्याचे आचरा येथील आशांकडून सांगण्यात आले. यामुळे १५जून च्या आंदोलनात जिल्ह्यातील सर्व आशा आणि गटप्रवर्तक सहभागी झाले असून आचरा येथील अस्मिता आचरेकर,रमिता जोशी, नमिता आचरेकर, सीमा बागवे, प्रियांका राणे यांनी या आंदोलनात सहभागी होत असल्याचे पत्र आचरा आरोग्य अधिकारी यांना दिले आहे.

अभिप्राय द्या..