मनसेचे राज्यपरिवहन उपाध्यक्ष बनी नाडकर्णी यांच्याकडून कुडाळ एसटी डेपोला ५३ चंदन झाडांची रोपे सुपूर्द..

मनसेचे राज्यपरिवहन उपाध्यक्ष बनी नाडकर्णी यांच्याकडून कुडाळ एसटी डेपोला ५३ चंदन झाडांची रोपे सुपूर्द..

कुडाळ /-

कुडाळ एसटी डेपोमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्यपरिवहन मंडल उपाध्यक्ष बनी नाडकर्णी यांनी कुडाळ डेपोमद्धे ५३ चंदन झाडांची रोपे ,डेपो मॅनेजर श्री.डोंगरे यांच्याकडे सुपूर्द केली,राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ही चंदन रोपे डेपोला देण्यात आली आहेत.

महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेतर्फे ही चंदन झाडाची रोपे देण्यात आली आहेत.मनसेचे माननीय श्री हरी माळी यांच्या मार्गदर्शनाखाली कुडाळ डेपोमध्ये चंदनाच्या झाडांची रोपे तसेच त्यांना लागणारे खत डेपो मॅनेजर कडे सुपूर्द केले आहे.सध्या करोना काळात सर्वसामान्य जनतेला ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे होणाऱ्या नुकसानाचे गांभीर्य लक्षात आलेली असून जास्तीत जास्त झाडे लावून निसर्गापासून दूर जाणाऱ्या लोकांनी कोकणाचा कॅलिफोर्निया करावा असे आज कुडाळ येथे मीडियाशी बोलताना बनी नाडकर्णी यांनी सांगितले.ही दिलेली चंदन रोपे,देखभाल ही एसटी कर्मचाऱ्यांनी करावी अशी विनंती बनी नाडकर्णी केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेनेकडून कुठल्याही प्रकारची मदत लागल्यास त्यांनी कळवावे असे आव्हान केले बनी नाडकर्णी यांनी केले आहे.

अभिप्राय द्या..