पळसंब येथे आमडोस्कर कुटुंबाकडून जिवनावश्यक वस्तूंचे वाटप..

पळसंब येथे आमडोस्कर कुटुंबाकडून जिवनावश्यक वस्तूंचे वाटप..

आचरा /-

शालीनी आमडोस्कर यांच्या प्रथम स्म्रूतीदिना निमित्त त्यांची पुतणी संजना आमडोस्कर यांच्या कडून पळसंब गावठण वाडी येथे जिवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.त्यांच्या या सहकार्याबद्दल पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

कोरोना महामारीत संचारबंदीचा फटका सामान्य माणसांना बसला आहे. याची दखल घेत पळसंब येथील मुंबई स्थित आमडोस्कर कुटुंबियांनी तांदूळ, डाळ,वाटाणा,साखर आदी जिवनावश्यक वस्तूंची शंभर पाकिटे गावी पाठवली होती त्यांचे वाटप सोमवारी पळसंब गावठण वाडी येथील ग्रामस्थांना पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांच्या सोबत प्रमोद सावंत, रोशन चिंचवलकर,दाजी जुवेकर, मधुकर परब,अशोक जुवेकर आदी ग्रामस्थांनी वाटप करण्यात सहभाग दर्शविला होता.आमडोस्कर कुटुंबाने दाखविलेल्या या सहकार्याबद्दल ग्रामस्थांमधून कौतुक होत आहे.

अभिप्राय द्या..