कुडाळ येथील कोविड केअर सेंटर महिला रुग्णालयातच सुरु राहणार.; जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

कुडाळ येथील कोविड केअर सेंटर महिला रुग्णालयातच सुरु राहणार.; जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी

कोविड केअर सेंटर हलविण्यास मा. जिल्हाधिकारी यांनी दिली स्थगीती, आमदार वैभवजी नाईक यांच्या मागणीला यश.

कुडाळ /-

कुडाळ येथील महिला रुग्णालयातील कोविड केअर सेंटर मधील सध्या उपलब्ध असलेल्या ७० ऑक्सिजन बेड ची क्षमता वाढविण्यासाठी तसेच ऑक्सिजन लाईन चे काम सुरु करण्यासाठी महिला रुग्णालयातील कोविड केअर सेंटर हे ओरोस येथे हलविण्यात येणार होते. परंतु सध्या कुडाळ शहरामध्ये इतर कोविड केअर सेंटर नसल्याने हे सेंटर सुरूच ठेवावे अशी विनंती आमदार वैभवजी नाईक यांनी मा. जिल्हाधिकारी यांना केली. तसेच या कोविड केअर सेंटरचा फायदा कुडाळ तालुक्यातील सर्व नागरिकांना होत असल्याची जाणीव करून दिली. त्यामुळे नागरिकांच्या सोयीकरिता आमदार वैभवजी नाईक यांच्या विनंतीला मान देऊन कुडाळ महिला रुग्णालयातील कोविड केअर सेंटर त्याच ठिकाणी सुरु ठेवण्याचे मा. जिल्हाधिकारी यांनी कबुल केले आहे. व त्या प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. अशी माहिती शिवसेना तालुकाप्रमुख श्री. राजन नाईक यांनी दिली आहे.
त्याचप्रमाणे कुडाळ तालुक्यातील मुळदे येथील कॉलेजमध्ये नवीन कोविड केअर सेंटर सुरु करण्याची विनंती आमदार वैभवजी नाईक यांनी मा. जिल्हाधिकारी यांना केली आहे.

अभिप्राय द्या..