पळसंब गावठणवाडी साकव दुरुस्ती तात्काळ करा.;सरपंच श्री.चद्रकांत गोलतकर याची मागणी..

पळसंब गावठणवाडी साकव दुरुस्ती तात्काळ करा.;सरपंच श्री.चद्रकांत गोलतकर याची मागणी..

आचरा /-

पळसंब गावठणवाडी झरीचा व्हाळ येथील , वैभव परब घर ते पळसंब शाळा न. १या पायवाटेवरील लोखडी साकव ला असलेले आधाराचे अँगल तुटल्यामुळे मोठा धोका निर्माण झाला आहे. यामुळे हा केव्हाही कोसळून दुर्घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.याबाबत शासनाने तातडीने दखल घेत या साकवाची दुरुस्ती करण्याची मागणी पळसंब सरपंच चंद्रकांत गोलतकर यांनी केली आहे.
पळसंब गावठणवाडी शाळा नंबर१ या रस्त्यावरील लोखंडी साकवावरुन
दररोज लहान मुले , शेतकरी, स्थानिक रहिवाशी याची मोठ्या प्रमाणात रहदारी असते. मुख्य रस्त्याला जोडणारा हा गावातून येणारा जोड रस्ता असल्याने रहदारी चा रस्ता म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या जोडरस्त्यावरील ओहोळावर असलेल्या लोखंडी साकवाचे अँगल गंजून धोकादायक बनल्याने दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या साठी या भागाचे,पचायत समिती सदस्य , जिल्हा परिषद सदस्य , स्थानिक आमदार , खासदार यानी लक्ष घालून लवकरात लवकर सबंधीत विभागामार्फत साकवाची दुरूस्ती करण्याची मागणी सरपंच गोलतकर यानी केली आहे.

अभिप्राय द्या..