मालवण भरड येथील करलकर पाणंद मार्गावर पेव्हर ब्लॉक.;नागरिकांनी मानले नगरसेवक यतीन खोत यांचे आभार..

मालवण भरड येथील करलकर पाणंद मार्गावर पेव्हर ब्लॉक.;नागरिकांनी मानले नगरसेवक यतीन खोत यांचे आभार..

मालवण /-


मालवण शहरातील भरड येथील करलकर पाणंद हा मार्ग पूर्णपणे खड्डेमय बनला होता. या मार्गाची दुरुस्ती व्हावी ही येथील नागरिक रहिवाशी यांची मागणी नगरसेवक यतीन खोत यांनी नगरपालिकेच्या माध्यमातून पूर्णत्वास नेली आहे.

यतीन खोत यांनी आपल्या बांधकाम सभापती पदाच्या कार्यकाळात मंजूर केलेल्या अनेक कामांपैकी करककर पाणंद मार्ग पेव्हर ब्लॉक बसवून नूतनीकरण करणे या कामासही मंजुरी दिली होती.

मंजूर असलेले हे काम आता पूर्ण करण्यात आले आहे. याबाबत येथील रहिवासी नागरिकांनी समाधान व्यक्त करत यतीन खोत व मालवण नगरपालिकेचे आभार मानले आहेत.

अभिप्राय द्या..