You are currently viewing डॉ.होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेत टोपीवाला हायस्कूलच्या श्रेयस बर्वे ने मिळविले रौप्यपदक..

डॉ.होमी भाभा बालवैज्ञानिक परीक्षेत टोपीवाला हायस्कूलच्या श्रेयस बर्वे ने मिळविले रौप्यपदक..

मालवण /-


डॉ.होमी भाभा बालवैज्ञानिक सन २०२०-२१ या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून मालवणच्या अ. शि. देसाई टोपीवाला हायस्कूलचा इयत्ता सहावी मधील विद्यार्थी कुमार श्रेयस चंद्रशेखर बर्वे याने घवघवीत यश संपादित करीत रौप्य पदक पटकाविले दरवर्षीप्रमाणे यावर्षीही डॉ.होमी भाभा बालवैज्ञानिक स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेत मालवणच्या अ. शि. देसाई टोपीवाला हायस्कूलचा इयत्ता सहावी मधील विद्यार्थी कुमार श्रेयस चंद्रशेखर बर्वे हा विद्यार्थी सहभागी झाला होता यापूर्वीही श्रेयस याने इयत्ता पाचवीमध्ये शिष्यवृत्ती परीक्षेत राज्य गणुवत्ता यादीत आणि गणित अध्यापक मडंळातर्फे घेण्यात येणाऱ्या गणित प्रज्ञा परीक्षेतही राज्य गणुवत्ता यादीत चमकण्याचा मान पटकावला होता. त्याच्या या यशाबद्दल टोपीवाला हायस्कूलचे मुख्याध्यापक, संस्थाचालक आणि सर्व शिक्षक व शिक्षकेतर यांनी त्याचे अभिनंदन केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा