You are currently viewing कुडाळ सोनवडे टेंबवाडी येथे एकाची गळफास लावून आत्महत्या..

कुडाळ सोनवडे टेंबवाडी येथे एकाची गळफास लावून आत्महत्या..

कुडाळ /-

कुडाळ तालुक्यातील सोनवडे टेंबवाडी येथील रामच्रंद गणपत घाडीगावकर (४८ ) यांनी आपल्या घरात रविवारी सकाळी ९.३० वा. पुर्वी गळफास लावून आत्महत्या केली.रामचंद्र घाडीगावकर यांची मनस्थिती काहीशी ठिक नव्हती. त्यांच्यावर कुडाळमधील खाजगी दवाखान्यात उपचारही चालू होते. यानंतर आज त्यांनी आपल्या घरात जेवणाच्या खोलीत लाकडी बाराला प्लँस्टिक वायरने गळफास लावुन घेऊन आत्महत्या केली.या घटनेची फिर्याद सौ.समिक्षा संतोष गावकर रा. सोनवडे टेंबवाडी यांनी कुडाळ पोलिसात दिली. श्री गावकर हे आपल्या घरात एकटेच राहत होते. दरम्यान नातेवाईक सकाळी घरात गेल्यावर ते गळफास लावलेल्या स्थितीत आढळून आले. त्यांच्या पश्चात एक मुलगा असा परिवार आहे. याबाबत अधिक तपास चद्रकांत झोरे करत आहेत.

अभिप्राय द्या..