सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात कॉंग्रेस कडून मदत..

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात कॉंग्रेस कडून मदत..

सावंतवाडी /-

सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात कॉंग्रेस कडून तालुकाध्यक्ष महेंद्र सांगेलकर आणि शहर अध्यक्ष राघवेंद्र नार्वेकर यांनी कॉंग्रेस थाळी सुरू केली होती. या थाळीला हातभार लावण्यासाठी स्वतः महेंद्र सांगेलकर यांची पत्नी सौ. उल्का सांगेलकर आणि सौ. रिटा डिसोजा यांनी स्वतः पुढाकार घेऊन जेवण तयार केले आहे,आणि आज १०० रुग्णांना अन्नदान केले आहे.त्यांनी केलेल्या या कार्यामुळे सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. यावेळी आजच्या कॉंग्रेस थाळीचे वाटप दोडामार्ग कॉंग्रेस सरचिटणीस बाबू गावडे यांचा उपस्थितीत करण्यात आले आहे.

अभिप्राय द्या..