मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण,आशा सेविकांना मास्कशिल्ड आणि सॅनिटायझर वाटप..

मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण,आशा सेविकांना मास्कशिल्ड आणि सॅनिटायझर वाटप..

कुडाळ /-

माणगाव खोऱ्यात घावनळे जि प मतदारसंघ आणि माणगाव जि प मतदारसंघात युवासेनेच्या वतीने मा जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट,युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी आणि जिल्हा परिषद सदस्य राजू कवीटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत महादेवाचे केरवडे तसेच माणगाव येथे वृक्षारोपण करण्यात आले तसेच मा आमदार वैभवजी नाईक यांच्या माध्यमातून आशा सेविकांना मास्कशिल्ड आणि सॅनिटायझर वाटप करण्यात आले यावेळी युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट,जि.प.सदस्य राजू कवीटकर,युवासेना तालुकाप्रमुख योगेश धुरी,शिवसेना विभागसंघटक कौशल जोशी,महादेवाचे केरवडे सरपंच तुषार परब,प्रणय नाईक,माजी उपविभाग प्रमुख रमाकांत धुरी,सचिन परब आदी उपस्थित होते

अभिप्राय द्या..