You are currently viewing सध्याच्या स्तर ४ मधील लागू निर्बंधांना २१ जूनपर्यंत मुदतवाढ.;जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांचे आदेश..

सध्याच्या स्तर ४ मधील लागू निर्बंधांना २१ जूनपर्यंत मुदतवाढ.;जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांचे आदेश..

सिंधुदुर्गनगरी /-

जिल्ह्यासाठी स्तर-4 चे निर्बंध लागू केलेले आहेत.शासनाच्या निर्देशाप्रमाणे जिल्ह्यासाठी निर्बंधांना १४ जून सकाळी ७ वाजल्यापासून २१ जून सकाळी ७ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी आज दिला.शासनाकडील १० जूनच्या आदेशानुसार साप्ताहिक पाॕझीटिव्हिटी रेट व आॕक्सीजन बेडस व्यापल्याची टक्केवारी प्रसिध्द करण्यात आली आहे. जिल्ह्यामध्ये कोविड बाधीत रुग्णांचा पॉझिटिव्हीटी रेट हा ११.८९ टक्के असून,ऑक्सिजन बेड्स व्यापल्याची टक्केवारी ५१.५९ टक्के इतका आहे. सद्यस्थितीत देखील सिंधुदुर्ग जिल्हा स्तर-4 मध्ये असल्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्याला लागू करण्यात आलेल्या आदेशास १४ जून रोजी सकाळी ७ वाजल्यापासून २१ जून रोजीच्या सकाळी ७ वाजेपर्यंत मुदतवाढ देण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा