आचऱ्यात गावसुरक्षेसाठी झटणाऱ्या ग्रामस्थांना आणि पोलिसांना मोफत न्याहारी..

आचऱ्यात गावसुरक्षेसाठी झटणाऱ्या ग्रामस्थांना आणि पोलिसांना मोफत न्याहारी..

आचरा /-

कोरोना मुक्ती साठी आचरा गाव एकवटला असून गावच्या सुरक्षेसाठी सीमेवर भर पावसात
दिवसभर सेवा देणारया ग्रामस्थांसाठी न्याहारीची व्यवस्था व्हावी तसेच कोविड सेंटर येथे असलेल्या रुग्णांनाही सोई उपलब्ध व्हावी या हेतूने सनियंत्रण समिती सदस्य अर्जुन बापर्डेकर यांनी देवस्थान अध्यक्ष मिलिंद मिराशी व स्वामी समर्थ मठाचे सुनील खरात यांच्या शी संपर्क साधून सहकार्य करण्याची मागणी केली होती. त्याला तातडीने प्रतिसाद देत
इनामदार श्री देव रामेश्वर देवस्थान तर्फे गावच्या मालवण देवगड कणकवली या बाजूंच्या सीमेवर कार्यरत ग्रामस्थांसाठी सकाळच्या मोफत न्याहारीची व्यवस्था केली गेली . तर स्वामी समर्थ मठ शिक्षक काँलनी तर्फे कोविड सेंटर येथे असलेल्या रुग्णांना सकाळ संध्याकाळ मोफत न्याहारीची व्यवस्था केली आहे. रामेश्वर देवस्थान समितीचे अध्यक्ष मिलिंद मिराशी, खजिनदार सुधीर सुखटणकर यांच्या सह सर्व समिती पदाधिकारी सदस्य तसेच स्वामी समर्थ मठ आचराचे सुनील खरात तसेच सर्व सहकारी स्वामी भक्त यांचे आचरा सरपंच प्रणया टेमकर, जिल्हा परिषद सदस्य जेरॉन फर्नांडिस तसेच ग्रामसनियंत्रण समितीच्या वतीने धन्यवाद व्यक्त करण्यात येत आहेत,

अभिप्राय द्या..