उद्योजक प्रकाश मेस्त्री यांच्या कडून आचरा प्राथमिक आरोग्य केद्राला औषधे वाटप..

उद्योजक प्रकाश मेस्त्री यांच्या कडून आचरा प्राथमिक आरोग्य केद्राला औषधे वाटप..

आचरा /-

कोरोना काळात औषधे, सँनिटायझरची कमतरता भासू नये या उद्देशाने चिंदर सडेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते आणि उद्योजक प्रकाश मेस्त्री यांनी सुविधा इंस्ट्यूट्यूट आँफ टेक्नॉलॉजीचे व्यवस्थापकीय संचालक वसंत मेस्त्री आणि संचालक संतोष मेस्त्री यांच्या सहकार्याने शुक्रवारी प्राथमिक आरोग्य केंद्र आचरा येथे वैद्यकीय साहित्य आणि औषधे प्राथमिक आरोग्य केंद्र आचरा चे डॉ शामराव जाधव यांच्या कडे सुपूर्द केली.यावेळी त्यांच्या सोबत आरोग्य कर्मचारी संदिप परब, आरोग्य कर्मचारी आदी उपस्थित होते. यावेळी प्रकाश मेस्त्री यांच्या सहकार्याने आचरा गावबंदी साठी गावाच्या सीमेवर सुरक्षेसाठी कार्यरत ग्रामस्थांना मास्क उपलब्ध करून दिले आहेत. याचे वाटप शुक्रवारी सायंकाळी अर्जुन बापर्डेकर यांच्या हस्ते मालवण बाजूला कार्यरत ग्रामस्थांना मास्क वाटप करून केले गेले. यावेळी मारुती आचरेकर, शंकर मिराशी, मंदार सरजोशी, रोहीत भिरवंडेकर, सायली आचरेकर, मिनल कोदे, कांबळी, आदी ग्रामस्थ होमगार्ड उपस्थित होते.

अभिप्राय द्या..