कांदळगावात झाले ४८ हजार आर्सेनिक गोळ्यांचे वाटप! माजी सभापती उदय परब यांचे विशेष प्रयत्न

कांदळगावात झाले ४८ हजार आर्सेनिक गोळ्यांचे वाटप! माजी सभापती उदय परब यांचे विशेष प्रयत्न

मसुरे /-

कोरोनामुळे मालवण तालुक्यातील कांदळगावातील आठ ग्रामस्थांचा मृत्यू झाला ही गंभीर बाब होती. पूर्ण वाडीच्या वाडी कोरोनाने संक्रमित होण्याची चिन्हे होती. त्यामुळे गावातील ग्रामस्थांची प्रतिकार शक्ती वाढावी यासाठी प्रयत्न होणे गरजेचे होते. एक लोकप्रतिनिधी म्हणून याबाबत माझ्या बालमोहन विद्यामंदिर मुंबई येथील वर्ग मित्रांशी बोलणे चालू असताना ग्रामस्थांना आर्सेनिक अलबम गोळ्या वाटण्या बाबत निर्णय झाला आणि तब्बल ४८हजार गोळ्यांचे वाटप गावात पूर्ण झाल्याची माहिती माजी सभापती उदय परब यांनी दिली. संपूर्ण गावाचे आरोग्य चांगले रहावे यासाठी कार्यरत माजी सभापती उदय परब याना हडी, रेवंडी, सर्जेकोट, कोळंब, महान या गावानी पंचायत समिती मध्ये नेतृत्व करण्याची संधी दिल्याने या गावात सुद्धा गोळ्या वाटप करण्याचा त्यांचा मानस असून त्या दृष्टीने पाठ पुरावा सुरू आहे.
गेल्या वर्षी माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या माध्यमातुन आर्सेनीक गोळ्या वाटप करण्यात आले होते. आणि रोग प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी प्रयत्न झाला होता. परंतु यावर्षी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठा फटका कांदळगावला बसला. गावातील ग्रामस्थांची रोग प्रतिकार शक्ती वाढावी यासाठी मग परब यांनी मुंबई येथील वर्गमित्रांना आर्सेनिक गोळ्या उपलब्ध करण्याबाबत मागणी केली व तब्बल ४८ हजार गोळ्यांचे वाटप गावातील ग्रामस्थांना करण्यात आले.
गावात गोळ्यांचे वाटप करताना सरपंच सौ.उमदी उदय परब, उपसरपंच आनंद आयकर, माजी उपसरपंच बाबू राणे, अंगणवाडी सेविका दिपिका बागवे, प्रमोद परब, आशा स्वयंसेविका स्वाती बेलवलकर, यश कांदळकर, आशिष आचरेकर, श्रृतिका कुंभार, प्रज्ञा मेस्त्री, रणजित परब, गजानन सुर्वे, सुनील कदम, राज कदम, भास्कर पाताडे, जयेश सुर्वे, मनोज आचरेकर, प्रमोद परब, महेश साळकर, गुंजन सुर्वे, भाऊ गुरव, मंदार सातार्डेकर आदींचे सहकार्य परब याना लाभले आहे.
गोळ्या उपलब्ध होण्यासाठी परब यांचे मित्र योगेंद्र तरे, डॉ. विनय यांच्या माध्यमातून पाठपुरावा करण्यात आला होता. परब यांची पत्नी सौ उमदी परब या गावच्या सरपंच असून गावच्या पालकत्वाच्या दुहेरी जबाबदारीतून माजी सभापती उदय परब यांच्या प्रयत्नाने रोग प्रतिकार शक्ती वाढविणाऱ्या ४८ हजार आर्सेनिक अलबम या गोळ्यांचे वाटप झाल्याने त्यांनी सामाजिक बांधिलकी सुद्धा जपली आहे.

अभिप्राय द्या..