बेरोजगारांना बेरोजगार भत्ता मिळावा यासाठी मनसेकडून तहसीलदार यांना निवेदन

बेरोजगारांना बेरोजगार भत्ता मिळावा यासाठी मनसेकडून तहसीलदार यांना निवेदन

वेंगुर्ले /-

कोरोना च्या महामारीमुळे लाॅकडाऊन च्या काळात ज्याच्या नोकर्या गेल्या अशा बेरोजगारांना बेरोजगार भत्ता शासनाकडून मिळावा या साठी महाराष्ट्र नव निर्माण सेना वेंगुर्ले तालुक्याच्या वतीनं वेंगुर्ला तहसीलदार श्री.प्रविण लोकरे यांना निवेदन देण्यात आल.या प्रसंगी वेंगुर्ला संपर्क अध्यक्ष सागर तुळसकर, तालुकाध्यक्ष सनी बागकर, मनविसे उपजिल्हा अध्यक्ष परशुराम उर्फ आबा परब,मनविसे तालुका अध्यक्ष महादेव (मॅडी)तांडेल,उपतालुका अध्यक्ष आबा चिपकर,विभाग अध्यक्ष विनायक फटनाईक,शाखा अध्यक्ष दिपक परब ,दिपक फटनाईक आदी उपस्थिती होते.

अभिप्राय द्या..