वेंगुर्ला तालुक्यात आज १७ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह

वेंगुर्ला तालुक्यात आज १७ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह

वेंगुर्ला/-

वेंगुर्ला तालुक्यात सोमवारी आलेल्या कोरोना अहवालात एकूण १७ व्यक्तींचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.यामध्ये रेडी २ नवीन व्यक्ती,
श्रीरामवाडी येथील पॉझिटिव्ह संपर्कातील ४ व्यक्ती,भेंडमळा पॉझिटिव्ह संपर्कातील १ व्यक्ती,
वेंगुर्ला शहर १ नवीन पॉझिटिव्ह,सातेरी मंदिर येथील पॉझिटिव्ह संपर्कातील ७ व्यक्ती,
मांडवी येथील पॉझिटिव्ह संपर्कातील २ व्यक्ती अशा एकूण १७ व्यक्तींचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत,अशी माहिती वेंगुर्ले तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.अश्विनी माईणकर यांनी दिली आहे.
तसेच काल रविवारी प्राप्त अहवालानुसार
आरवली सखेलखोल १,
तुळस वडखोल १ व परुळे चिपी १ नवीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढलले असून शिरोडा येथील पॉझिटिव्ह संपर्कातील १ व्यक्तीचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.

अभिप्राय द्या..