दोडामार्ग-आंबेली येथे कोविड १९ लसीकरणास..

दोडामार्ग-आंबेली येथे कोविड १९ लसीकरणास..

दोडामार्ग /-

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सरपंच व कोरोना ग्राम कृती समिती गेल्या सव्वा वर्षापासून कोरोना विरोधात लढत आहेत.राज्यामध्ये पहिल्या लाटेपेक्षा कोरोनाची दुसरी लाट गावखेड्यात, वाड्या वस्तीवर पोहोचली आहे.प्रत्येक सरपंच व कोरोना ग्राम कृती समितीतील सदस्य जिवाची बाजी लावून गाव सुरक्षित ठेवण्यासाठी धडपडत आहेत.अशा वेळी लसीकरणही तितकेच महत्वाचे आहे.त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा परीषद आरोग्य विभागाच्यावतीने गावागावात उपकेंद्र स्तरावर आयोजित करण्यात येणाऱ्या ४५ वर्षावरील कोविड १९ लसीकरण कार्यक्रमाचा आंबेली गावातील अधिकाधिक लोकांनी लाभ घेऊन तालुका कोरोना मुक्तीकडे नेण्यास हातभार लावावा,असे प्रतिपादन डॉ.अनिषा दळवी यांनी आंबेली येथील लसीकरण कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी सांगितले.

झरेबांबर उपसरपंच सौ.शांती पालयेकर यांच्या सततच्या पाठपुराव्याने आंबेली देउळवाडी येथील जिल्हा परीषद शाळेत लसीकरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.यावेळी दोडामार्ग पंचायत समिती सदस्य लक्ष्मण (बाळा) नाईक,भाजप तालुकाअध्यक्ष प्रविण गवस,सरचिटणीस विठोबा पालयेकर,प्रगतशील शेतकरी मोहन गवंडे,तातू पालयेकर,तालुका आरोग्य विभागाचे अजित सावंत,शिक्षक प्रशांत निंबाळकर,मोरगांव प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य कर्मचारी,आशा स्वयंसेविका,शिक्षक व इतर ग्रामस्थ व कर्मचारी उपस्थित होते.

दोडामार्ग पंचायत समिती सदस्य बाळा नाईक व विठोबा पालयेकर यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आंबेली गावात होणाऱ्या लसीकरण कार्यक्रमाबद्दल ग्रामस्थांमधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

अभिप्राय द्या..