मंत्र्यांसाठी दोडामार्ग हा गोव्यात जाताना प्रगतीच्या प्रतिक्षेत भेटलेल नैसर्गिक सोंदर्य…

दोडामार्ग /-

१९९९साली तालुका म्हणून उदयास आलेल्या दोडामार्ग तालुक्याची ओळख मात्र जैसे थे, दोडामार्ग तालुका हा दर्लक्षित रित्या निर्माण झालेला दुर्गम तालुका ही ओळख मात्र कायमच अशी चिन्हे दिसत असून तालुका मात्र अपुऱ्या सोयीसुविधांनी नटलेला आहे, त्यातच दोडामार्ग तालुक्यास भरभरून नैसर्गिक सोंदर्य मिळाले असून हे सोंदर्य मात्र अदोगतिकच्या पडद्याआडच राहिले आहे,गेली कित्येक वर्षे तालुका होवून लोटली परंतु सोयीसुविधा मात्र प्रगतीकडे जाण्याचे नावच घेत नाहीत हे दोडामार्ग वासीयांचे मात्र दुर्भाग्यच म्हणायला हरकत नाही.
रस्ते,वीज, पाणी अशा अनेक समस्या दोडामार्ग तालुक्यात घर करून बसल्या आहेत त्यातच रस्ता हा मृत्यूचा सापळा बनला असून वाहन चालक मात्र तारेवरची कसरत करत वाहन चालवत आहेत,दोडामार्ग तालुका हा पर्यटन म्हणून ओळखला जाणाऱ्या गोवा राज्याच्या अगदी हाकेच्या अंतरावर असल्याने अनेक पर्यटक गोव्यात जाताना दोडामार्ग तालुक्यातून प्रवास करतात परंतु दोडामार्ग मधील अपुऱ्या सोयी सुविधांसह दोडामार्गची दुरवस्था पाहता ते पुढे निघून जातात, दोडामार्ग हे पर्यटन क्षेत्र बनवणे अगदीच शक्य आहे कारण निसर्गगाने पर्यटनास लागणारी सर्व साधने भरभरून उपलब्ध करून दिली असून याकडे दुर्लक्ष होताना दिसत आहे.
तालुक्यातील घडणाऱ्या घडामोडींचा आणि अपुऱ्या सोयीसुविधांचा आढावा घेण्यासाठी एकही मंत्री येत नसतो मात्र गोवा राज्यातील वास्को विमानतळवर जाताना रस्त्यात भेटलेल्या दोडामार्ग मधून जात दोडामार्ग मधील अपुऱ्या सोयीसुविधांची पाहणी केल्याचे चित्र लोकांच्या डोळ्यासमोर निर्माण करत पुढे निघून जातात मात्र सोयीसुविधा अपुऱ्या राहतात याकडे मात्र कायमच दुर्लक्ष असते असाच काहीसा प्रकार निवडणुका जवळ आल्यावर निर्माण होताना दिसतो निवडणूक काळाच्या दोन दिवस अगोदर दोडामार्ग तालुक्यात अनेक कामांसाठी भूमीपूजने केली जातात पण मात्र ह्या भूमीपूजनांवर निवडणूक संपल्यानंतर कोणत्याही प्रकारचे काम सुरू होताना दिसत नाही गेल्या निवडणूक काळात देखील अशा प्रकारच्या अनेक कामांसाठी दोडामार्ग तालुक्यता भूमीपूजने करण्यात आली परंतु ह्या करण्यात आलेल्या भूमीपूजनांचे काम पूर्ण करण्यात आले की नाही की फक्त जनतेची दिशाभूल केली असा संभ्रम दोडामार्ग वासीयांच्या मनात उद्भवत आहे, निवडणूक अगोदरच्या काळात केलेली भूमिपूजने नक्की कुणासाठी दोडामार्ग वासीयांसाठी की निवडणुक काळात मत मिळवण्याच्या दृष्टीने जनतेची दिशाभूल करत आपल्या फायद्यासाठी असा प्रश्न देखील दोडामार्ग वासीयांच्या मनात निर्माण झाला असून भूमीपूजन केलेल्या जागी अध्याप देखील मात्र कोणतेही काम दिसत नसल्याचा आरोप जनतेतून होत आहे ,यासाठी दोडामार्ग मधील जनतेने याचा आढावा घेणे आवश्यक आहे अन्यथा नैसर्गिक सोंदर्याने भरभरुन नटलेला दोडामार्ग अधोगतिच्या प्रगतीपथावर जाण्यापासून रोखणे कठीण होईल म्हणूनच दोडामार्ग तालुका प्रगती पथावर नेण्यासाठी झालेल्या विकास कामांचा आढावा घेत व उर्वरित कामांचा पाठपुरावा करावा अशी मागणी संभ्रमात पडलेल्या दोडामार्ग तालुका वासीयांकडून होताना दिसत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

You cannot copy content of this page