राष्ट्रवादी तर्फे वेंगुर्ले पोष्ट मध्ये कोरोना प्रतिबंधक औषध वाटप…

राष्ट्रवादी तर्फे वेंगुर्ले पोष्ट मध्ये कोरोना प्रतिबंधक औषध वाटप…

वेंगुर्ला /-

जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्ग दिवसेंदिवस वाढत असून पोष्ट कर्मचारी यांचा जनसंपर्क जास्त असल्याने त्यांनी संसर्गाबाबतीत जास्त सतर्क राहिले पाहिजे.सर्दी पडसे झालेला रुग्ण न्युमोनिया होऊन कोरोना विषाणूला जास्त बळी पडतो हे टाळण्यासाठी अर्सेनीक अल्बम३०हे होमिओपॅथीक औषध जास्त परिणामकारक ठरते.असे प्रतिपादन वेंगुर्ले पोष्ट येथे पोस्ट अधिकारी धोंडु सावंत यांच्या कडे औषध वितरण करताना राष्ट्रवादी डॉक्टर सेल जिल्हा अध्यक्ष जनसेवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष होमिओपॅथीतज्ञ डॉ. संजीव लिंगवत यांनी केले.
यावेळी महाराष्ट्र शासनाच्या परिपत्रक व ग्रामविकास विभाग यांच्या आदेशानुसार जिल्हा राष्ट्रवादी डॉक्टर्स सेल वेंगुर्ले शहर राष्ट्रवादी पक्ष व जनसेवा प्रतिष्ठान यांच्या तर्फे आपण औषध वितरण करत असल्याचे डॉ. लिंगवत यांनी सांगितले.

यावेळी राष्ट्रवादी वेंगुर्ले शहराध्यक्ष सत्यवान साटेलकर, सिंधुदुर्ग जिल्हा बँक माजी संचालक नितीन कुबल पोष्ट कर्मचारी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..