आचरा /-


नैसर्गिक आपत्तीत पर्यावरणाचा -हास होत आहे. अनेकांची धरती आंबा कलमे उन्मळून पडलीत अशा आचरा गावातील शेतकऱ्यांना आधार मिळावा आणि पर्यावरण संवर्धन व्हावे या उद्देशाने बाळ सरजोशी चँरीटेबल ट्रस्ट तर्फे आंबा कलमांचे वाटप करण्यात येणार आहे. याचा शुभारंभ ट्रस्ट चे अध्यक्ष निलेश सरजोशी यांच्या हस्ते रविवारी करण्यात आला.
यावेळी त्यांच्या सोबत केंद्र प्रमुख सुगंधी गुरव,अभय भोसले, विनायक परब,मुख्याध्यापक मारुती आचरेकर,माजी सरपंच चंदन पांग,शंकर मिराशी,बबन शेट्ये,मंदार सरजोशी,विजय कदम आचरा व्यापारी संघटनेचे हेमंत गोवेकर, चंदू कदम,रुपेश हडकर,सायली आचरेकर, यांसह अन्य मान्यवर आदी उपस्थित होते.
यावेळी ट्रस्ट चे अध्यक्ष निलेश सरजोशी यांच्या ४४व्या वाढदिवसानिमित्त ४४ पळसाच्या रोपांचे वाटप करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page