आमदार नितेश राणे देणार मतदारसंघातील सर्व सरपंचांना विमा कवच..

आमदार नितेश राणे देणार मतदारसंघातील सर्व सरपंचांना विमा कवच..


आम.नितेश राणे यांनी पुन्हा स्वीकारले पालकत्व
सरकारला शक्य झाले नाही ती सरपंचांची मागणी आम.राणे यांनी केली पूर्ण..

कणकवली /-

  • ३ लाखाच्या आरोग्य विम्यासह ७ लाख ५० हजारापर्यत मिळणार मोबदला
  • कणकवली-देवगड- वैभववाडी मतदारसंघातील सर्व सरपंचांना प्रत्येकी ३ लाखाचा आरोग्य विमा आणि ७ लाख ५० हजार पर्यंतचा मोबदला मिळेल असे विमा कवच दिले जाणार आहे.ज्या मतदारांनी मला निवडून दिलंय. त्या सर्वांचं मी प्रतिनिधित्व करतोय. त्यामुळे मतदारसंघातील सर्व सरपंचाचा विमा उतरवून त्यांना संरक्षण देण्याची जबाबदारी माझी आहे.येत्या चार दिवसात सर्व सरपंचाचे विमा उतरण्याची प्रक्रिया देशातील चोला मंडलम या प्रसिद्ध इन्शुरन्स कंपनी कडून पूर्ण केली जाईल अशी माहिती भाजपा आमदार नीतेश राणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
  • आम.नितेश राणे यांनी zoom अँप वरून व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून पत्रकार परिषद घेतली.यावेळी ते बोलत होते.आम.नितेश राणे म्हणाले, एक वर्षासाठी असणाऱ्या या विम्याला तीन लाखापर्यंत विमा संरक्षण मिळणार आहे, त्याचबरोबर ज्या सरपंचांचा ३ लाखाचा खर्च झाला असेल तर त्यांना आणखी ७५ हजार रुपये वाढवून मिळणार आहे.तसेच रुग्ण वाहिके पासून व्हीआयपी उपचार पद्धती यात लागू होणार आहे. कोरोना बरोबरच इतर आजारही या विमा कवच मध्ये समाविष्ट केले आहे.एकूण सात ते साडेसात लाख रुपयांचा खर्च ही कंपनी या विम्यात करणार आहे.
  • कोरोना काळात सरपंच मोठी जबाबदारी पार पाडत आहेत. ही जबाबदारी पार पाडत असताना अनेक सरपंचांचा मृत्यूही झाला आहे. परंतु शासनाने कोणतीही कार्यवाही केलेली नाही. मात्र लोकप्रतिनिधी या नात्याने मी सरपंचांची जबाबदारी घेत असून पक्षभेद न पाहता सर्वच सरपंचांचा विमा मी उतरवणार आणि ती प्रक्रिया सुरू केले आहे अशी ग्वाही श्री.राणे यांनी दिली.यात विमा कंपनी मध्ये सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक रुग्णालये आहेत आजून काही रुग्णालये जोडली जाणार आहेत असे सांगतानाच कोरोना मुक्त गाव करतानाच कोरोना भयमुक्त करणे गरजेचे आहे.सर्वच सरपंच या फ्रंटलईनवर काम करतात त्यांना संरक्षण देणे गरजेचे होते ते माझ्या मतदार संघातील सरपंचांन पासून सर्वात केली आहे.संपूर्ण जिल्हा हा राणेंवर प्रेम करणारा आहे त्या मुळे ही प्रक्रिया पूर्ण झाली की जिल्ह्यासाठी निश्चित विचार करू असेही आम.राणे यांनी एका प्रश्नावर बोलतांना सांगितले.माझ्या या कामाचे सत्ताधारी आणि पालकमंत्री यांनी अनुकरण करावे आणि जिल्हात असे विमा कवच द्यावे त्यात ते कमी पडले तर भाजपा च्या वतोने आम्ही सर्व सरपंचाना विमा कवच देऊ असेही त्यांनी सांगितले.
  • बॉक्स
  • कणकवली,देवगड,वैभववाडी मतदारसंघातील सर्वपक्षीय १६९ सरपंचना मिळणार विमा कवच
  • मागील सव्वा वर्षांपासून सरपंचांची सुरू असलेली मागणी आमदार नितेश राणे यांनी विमा कवच जाहीर करून पूर्ण केली आहे.यात कणकवली,देवगड,वैभववाडी या तिन्ही तालुक्यातील सर्व पक्षीय १६९ सरपंचाना लाभ मिळणार आहे. आम. नितेश राणे यांनी, कोविडच्या दुसऱ्या लाटेमध्ये जिल्ह्यातील सरपंचांचे मनोबल वाढवून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी सर्व आजारांवर साडे सात लाखाचे मोफत वैद्यकीय उपचार देण्यासाठी मेडिकल इंशुरन्स उतरण्याची मोठी घोषणा पत्रकार परीषदेत केली. या विमा पॉलिसी अंतर्गत प्रत्येक सरपंचाची ३ लाखाची विमा पॉलिसी उतरवली जाणार असून हा विमा एका वर्षासाठी मर्यादीत असणार आहे. मात्र एका वर्षाच्या मुदतीच्या आत तीन लाखाचे वैद्यकीय उपचार होवून आणखी वैद्यकीय खर्च वाढला तर पॉलिसी धारक सरपंचाला आणखी ७५ हजार रुपयांचं बेनिफिट दिले जाणार असून त्यापेक्षाही खर्च वाढल्यास तीन लाख रुपये अॕड आॕन केले जाणार आहेत. एकंदरीत पॉलिसीच्या एक वर्षाच्या कालावधीत साडेसात लाख रुपयांचे मोफत वैद्यकीय उपचार केले जाणार आहेत. यासोबतच लोकप्रतिनिधी असलेले सरपंच जर कामगार असतील तर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवण्यासाठी हॉस्पिटलमध्ये अॕडमीट असताना त्यांना प्रतिदिन ५०० रुपये डेलि कॕश बेनिफिट मिळणार आहे. आजारासंदर्भात पॉलिसी धारक सरपंचांनी कुठल्याही डॉक्टरचे सेकंड ओपिनियन घेतले तर सेकंड ओपिनियनची फी सुद्धा या पाॉलिसीतून सरपंचांना मिळणार आहे. तसेच सरपंचांना वैद्यकीय उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्यासाठी अँब्युलन्ससाठी दोन हजार रुपये मिळणार आहेत. मोतीबिंदू ऑपरेशन सारख्या काही ट्रीटमेंट ह्या डे केअर मध्ये समाविष्ट असतात. पॉलिसीधारक सरपंचानी हॉस्पिटलमध्ये ऍडमिट न होता डे केअर ट्रीटमेंट घेतली तर त्याचाही खर्च या पॉलिसीतून मिळणार आहे. सर्व सरपंचांची पॉलिसी उतरण्यासाठी माहिती गोळा झाल्यानंतर येत्या आठवड्याभरात प्रत्यक्ष पॉलिसी उतरण्यात येणार असल्याची माहिती भाजपा आमदार नितेश राणे यांनी दिली.

अभिप्राय द्या..