आचरा यैथे सात दिवसांचे कडक लाँकडाउन ९जून ते १५जून पर्यंत गावच्या सीमा होणार बंद..

आचरा यैथे सात दिवसांचे कडक लाँकडाउन ९जून ते १५जून पर्यंत गावच्या सीमा होणार बंद..

आचरा /-

आचरा गावात वाढत्या कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी आचरा गावात सात दिवसांचा लाँकडाउन करण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या आपत्कालीन समितीच्या बैठकीत घेण्यात आला.
यावेळी बाहेरील गावातील लोकांना गावात प्रवेश बंद करण्यात आला असून गावच्या सीमा बंद करण्यासाठी सीमेवर स्वयंसेवक नेमण्यात आले आहेत.

आचरा गावच्या आपत्कालीन समीतीची बैठक ग्रामपंचायत आचराच्या सभागृहात सरपंच प्रणया टेमकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली या वेळी जिल्हा परिषद सदस्य जेरॉन फर्नांडिस, उपसरपंच पांडुरंग वायंगणकर, पंचायत समिती सदस्य नीधी मुणगेकर, मंगेश टेमकर, माजी सरपंच राजन गांवकर,निलेश सरजोशी, जगदीश पांगे,अभय भोसले, ग्रामविकास अधिकारी गणेश परब,जयप्रकाश परुळेकर,अनिल करंजे, डॉ प्रमोद कोळंबकर पोलीस हवालदार सुनील चव्हाण, बँक अधिकारी, तलाठी यांसह समितीचे सर्व सदस्य आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..