कुडाळ /-
१८ ते ४५ वयोगटातील नागरिकांचे लसीकरण बंद आहे. मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातून मुंबई, पुणे, तसेच इतर ठिकाणी शिक्षणानिमित्त जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे कोविड लसीकरण होणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्याशी संपर्क साधून बाहेर गावी शिक्षणानिमित्त जाणाऱ्या विद्यार्थ्यांचे लसीकरण करून घेण्याची मागणी केली.या मागणीची दखल ना. उदय सामंत यांनी घेतली असून याबाबत त्यांनी राज्याचे आरोग्य संचालक यांच्याशी चर्चा केली आहे. लवकरच या विद्यार्थ्यांचे लसीकरण करण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे अशी माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली आहे.