कुडाळ /-
सेवानिवृत्त शिक्षक मिलिंद जाधव यांच्या निधनानंतर माजी नगरसेविका सरोज जाधव व त्यांच्या कुटुंबीयांची आमदार नितेश राणे यांनी भेट घेऊन सांत्वन केले.
कुडाळ नगरपंचायत वार्ड क्रमांक ७ च्या नगरसेविका सरोज जाधव यांचे पती सेवानिवृत्त शिक्षक मिलिंद जाधव यांचे अल्पशा आजाराने निधन झाले होते. मिलिंद जाधव यांच्या निधनानंतर जाधव कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. दरम्यान (रविवारी) आमदार नितेश राणे यांनी सरोज जाधव व त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. यावेळी भाजपाचे कुडाळ तालुकाध्यक्ष विनायक राणे, कुडाळ शहराध्यक्ष राकेश कांदे, महिला मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हाप्रमुख संध्या तेरसे उपस्थित होते.