त्रिंबक येथील ग्रामविलगीकरण कक्षाला दानशूर व्यक्तींकडून वैद्यकीय उपकरणे भेट..

त्रिंबक येथील ग्रामविलगीकरण कक्षाला दानशूर व्यक्तींकडून वैद्यकीय उपकरणे भेट..

आचरा /-

त्रिंबक येथील ग्रामविलगीकरण कक्षाला आवश्यक ती वैद्यकीय उपकरणे गावातील दानशूर व्यक्तींकडून भेट देण्यात आली आहेत.यात दिगंबर साटम यांच्या कडून तीन थर्मल गन ,सुनील वसंत नाईकसाटम यांच्या कडून तीन आँक्सिमिटर,संजय चंद्रकांत वेंगुर्लेकर यांच्या कडून दहा पीपीई किट,पल्लवी केशव जोशी यांच्या कडून गरम पाण्यासाठी आवश्यक शेगडी व टोप देण्यात आला आहे. त्यांच्या या सहकार्याबद्दल त्रिंबक सरपंच विलास त्रिंबककर,तंटामुक्त समिती अध्यक्ष श्रीकांत बागवे, पोलीस पाटील सिताराम सकपाळ यांनी धन्यवाद व्यक्त केले आहेत.

अभिप्राय द्या..