मालवण /-


सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यटन स्थळांविषयी माहिती टूर एजंट तसेच पर्यटनासाठी जिल्ह्यात येणाऱ्या देश विदेशातील नागरिकांना त्यांच्या स्थानिक भाषेत उपलब्ध झाल्यास जिल्हात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत वाढ होण्याच्या दृष्टीने मंगळवार दि ८ जून रोजी सकाळी ११ वाजता खासदार श्री सुरेशजी प्रभू यांच्या हस्ते व्हर्च्युअल सभेच्या माध्यमातून ५० पेक्षा जास्त भाषा असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्याची पर्यटन स्थळांची माहिती देणारे वेबसाईट चे उद्घाटन व लोकार्पण सोहळा होणार आहे. यावेळी भारत सरकारचे उपसंचालक श्री वेंकटेशन धट्टारेन , राज्याचे सहसंचालक श्री धनंजय सावळकर माजी डेप्युटी संचालक सौ. लीना लाड महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ, संचालक श्री दीपक हर्णे , सेक्रेटरी श्री उदय कदम यांच्या प्रमुख उपस्थिती होणार आहे ही वेबसाईट डेव्हलप करण्यासाठी महासंघाच्या सोशल मीडिया टीम प्रमुख श्री किशोर दाभोळकर यांच्या माध्यमातून काम चालू असून यामध्ये देशविदेशातील मराठी, हिंदी, तेलगू, मल्याळम, बंगाली, पंजाबी, कन्नड, उर्दू,इंग्रजी,चायनीज,रशियन,लॅटिन,पौर्तुगाल,तुर्की,अरेबियन अश्या प्रकारच्या ५० प्रमुख भाषेचा समावेश असणार आहे. सरकारी पातळीवर जिल्ह्याचा नियोजनबद्ध पध्दतीने स्थानिकांना समाविष्ट करून पर्यटन विकास होणे गरजेचे होते पर्यटन जिल्हा घोषित होऊन २३ वर्षापेक्षा जास्त काळ होऊन गेला आहे. पर्यटनाच्या माध्यमातून जिल्ह्याचा शाश्वत पर्यटन विकास व्हावा यांसाठी सिंधुदुर्ग पर्यटन व्यावसायिक महासंघा मार्फत प्रयत्न चालू असून संघा मार्फत जिह्यातील आठही तालुक्यात पदाधिकारी यांची नेमणूक करण्यात आली असून जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतीनां पत्रव्यवहार करून आपल्या गावचा पर्यटन विकास आराखडा बनविण्याची विनंती करण्यात आली असल्याची माहिती सिंधुदुर्ग पर्यटन व्यवसायीक महासंघ अध्यक्ष श्री बाबा मोंडकर यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page