वेंगुर्ला /-


वेंगुर्ले पंचायत समिती कार्यालय वेंगुर्ले येथे शिवराज्याभिषेक दिन उपसभापती सिद्धेश उर्फ भाई परब यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. शासनाच्या सूचनेनुसार राज्यातील सर्व जिल्हा परिषद, पंचायत समित्या आणि ग्रामपंचायती यामध्ये ६ जून हा दिवस शिवराज्याभिषेक दिन म्हणून साजरा करणेबाबत सूचना देण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने पंचायत समिती वेंगुर्ले येथे ६ जून २०२१ रोजी सकाळी ९ वाजता उपसभापती सिद्धेश परब यांच्या उपस्थितीत शिवराज्याभिषेकाचे गुढी उभारून व त्याचे पूजन करून शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. यावेळी पंचायत समितीचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page