वेंगुर्ला /-


वेंगुर्ले नगरपरिषदेने पावसाळा सुरु होणारा असतानाही शहरातील सर्रासपणे सर्वच पावसाळी पाणी निचऱ्याची गटारे अद्याप मोकळी केलेली नाहीत. ती त्वरित साफसफाई करावी,अशी मागणी वेंगुर्ले शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष सत्यवान साटेलकर यांनी लेखी निवेदनाव्दारे नगरपरिषदेकडे केली आहे.वेंगुर्ले नगरपरिषदेकडे सादर केलेल्या निवेदनात, वेंगुर्ले नगरपरिषदेने गेल्या २ ते ३ महिन्यांपासून भुमिगत विद्युतवाहिनी, पाण्याची लाईन तसेच गॅस लाईन टाकताना खोदाई केलेल्या भागातील माती गटारात पडून गटारे भरलेली आहेत. तसेच अवेळी पडलेल्या पावसाने सर्वच भागातील गटारे गाळाने भरलेली आहेत. मान्सूनची शक्यता असल्याने पावसाळी पाणी निचरा होण्यासाठी गटारे साफ असणे गरजेचे आहे. दरवर्षी हि गटारे लवकर काढली जात होती. पण यावेळी फार वेळ झालेला आहे. वेळीच गटारांची साफसफाई न झाल्यास पावसाचे पाणी गटारांतून रस्त्यावर व रस्त्यावरुन घरात जाऊन नुकसान होण्याची तसेच स्वच्छ शहरात अस्वच्छता निर्माण होणारी असल्याने तातडीने शहरातील सर्व पावसाळी पाण्याचा निचऱ्यासाठी बांधलेली गटारांची साफसफाई करुन नागरिकांना होऊ शकणारा त्रास दूर करावा. अशी मागणी वेंगुर्ले शहर राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सदस्य नितीन कुबल यांच्यासह शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page