कुडाळ /-
जिल्ह्यातील शासनाने रास्त भाव धान्य दुकानदारांना आरोग्यविषयक विमा कवच देण्यासाठी रास्त भाव धान्य दुकानदार चालक-मालक संघटना अध्यक्ष उमेश धुरी यांच्या वतीने पालकमंत्र्यांना निवेदन देण्यात आले होते. कोरोनाची दिवसेंदिवस वाढत असलेली रूग्ण संख्या ग्रामीण भागात दुकानदार पॉझिटिव्ह मिळत असल्याने शासनाने धान्य विक्री करण्यासाठी थक्स(अंगठा) लावण्यासाठी मुदत वाढ द्यावी.रास्त दुकानदारांना आरोग्याची चिंता वाढली आहे.शासनाने कुठलीही या विषयक व्यवस्था न केल्यामुळे जीव धोक्यात घालून लोकांची सेवा करावी लागते.पालकमंत्री, जिल्हाधिकारी,खासदार,आमदार यांनी रास्त दुकानदाराचे गरजा लक्षात घेऊन तातडीने आरोग्यविषयक विमा कवच द्यावे अशी मागणी रास्त भाव धान्य दुकान चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष उमेश धुरी यांनी केली आहे.