वैभववाडी /-
काॕग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या प्रमुख उपस्थितीत वैभववाडी तालुक्यातील अनेक कार्यकर्त्यांनी काॕग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.युवक काॕग्रेस तालुकाध्यक्ष भालचंद्र जाधव यांच्या नेतृत्वाखाली या कार्यकर्त्यांनी पक्ष प्रवेश केला आहे.
काॕग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आले होते.यावेळी युवक तालुकाध्यक्ष जाधव यांच्या प्रयत्नाने खांबाळे येथील आनंद पवार व त्यांच्यासमवेत संभाजी गुरव, विनोद पवार, उत्तम मोरे, अशोक मोरे, तर कोकिसरे येथील मधुकर पाटेकर, मंगेश ऊर्फ बाळा वळंजू, शशिकांत वळंजू, सुभाष लाड, अनिल पाटेकर, संतोष पालकर, दशरथ पालकर, संकेत पालकर, सोन्या पाटेकर, दिगंबर गुरव, निलेश आंबेरकर, संकेत रावराणे, तर लोरे नं.उमेश हळदणकर कुडाळ आदी कार्यकर्त्यांनी प्रवेश केला,
यावेळी माजी खासदार हुसेन दलवाई, महाराष्ट्र सरचिटणीस राजन भोसले, आमदार माणिकराव जगताप, जिल्हा नियोजन समिती सदस्य विकासभाई सावंत, जिल्हाध्यक्ष बाळा गावडे, सरचिटणीस महेंद्र सावंत,चिटणीस बाळू अंधारी,प्रांतिक सदस्य सुगंधा साटम, जिल्हा युवक काॕग्रेस अध्यक्ष देवानंद लुबडे, जिल्हा प्रवक्ते अरविंद मोंडकर, जिल्हा युवक कार्याध्यक्ष किरण टेंबुलकर, युवक काॕग्रेस तालुकाध्यक्ष भालचंद्र जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते.