वेंगुर्ला /-
वेंगुर्ले तालुक्यातील आडेली व तुळस प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी खनिकर्म निधीतून दोन रुग्णवाहिकांचे लोकार्पण पालकमंत्री उदय सामंत यांनी आज शनिवारी केले.या रुग्णवाहिका जनतेच्या सेवेत लवकरच रुजू होणार असल्याबाबतची माहिती वेंगुर्ले पंचायत समिती सदस्य ,माजी सभापती तथा शिवसेना तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब यांनी दिली.बाळू परब यांनी वारंवार पंचायत समिती सभेत याबाबत प्रश्न – ठराव मांडला होता.तसेच सभापती असताना जि.प.आरोग्य समिती सभेत याबाबत वारंवार पाठपुरावा केला होता.त्यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याने जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने दिलासा मिळाला आहे.नेहमीच जनतेच्या आरोग्याच्या व हिताच्या दृष्टीने आमदार दिपक केसरकर,पालकमंत्री उदय सामंत व खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्नशील राहणार असल्याचे बाळू परब यांनी सांगितले.