वेंगुर्ला /-
पंतप्रधान नरेंद्र मोदी ३० मे २०२१ रोजी आपल्या यशस्वी कार्यकालाला ७ वर्षे पूर्ण करीत आहेत.त्यानिमित्ताने भाजपाच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्ह्यात सेवाभावी उपक्रम आयोजित करुन हा दिवस साजरा केला जाणार आहे व पुढील सात दिवस विविध लोकोपयोगी सेवाकार्य घेऊन सेवा सप्ताह साजरा करण्यात येणार आहे,अशी माहिती भाजपा जिल्हा सरचिटणीस
प्रसन्ना ऊर्फ बाळु देसाई यांनी दिली.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अंत्योदयाच्या विविध योजना आणुन समाजाच्या शेवटच्या घटकाला केंद्रबिंदू मानुन विविध लोकाभिमुख योजना कार्यान्वित केल्या.सलग
दुसऱ्यांदा सत्तेत आलेल्या भाजपा सरकारला ३० मे रोजी दोन वर्षे पुर्ण होत आहेत.सलग ७ वर्षे सत्तेत असलेल्या मोदी सरकारच्या दुसऱ्या खेपेच्या या
दुसऱ्या वर्धापनदिनाचे निमित्त साधत सेवा सप्ताहाचे आयोजन केले आहे.या सेवा सप्ताहामध्ये कोव्हिड काळात सेवाभावी वृत्तीने काम केलेल्यांचा सन्मान,कोव्हिड योद्ध्यांचा सन्मान, लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना काॅफी व बिस्किट वाटप, रक्तदान शिबिर, स्वच्छता अभियान,ज्येष्ठ नागरिक सन्मान ,दिव्यांग सेवा इत्यादी सेवाभावी उपक्रम आयोजित करण्यात येणार आहेत.